Ad will apear here
Next
‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’तर्फे सलग सातव्या वर्षी नवरात्रोत्सवात घरखरेदीची सुवर्णसंधी
गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले आणि संचालिका पूनम गोखले यांनी पत्रकार परिषदेत नवरात्रोत्सवातील भव्य गृहमहोत्सवाची माहिती दिली.

पुणे : दर्जेदार निवासी गृहप्रकल्पांची निर्मिती व जुन्या निवासी इमारतींचा पुनर्विकास या क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या ‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’तर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रात भव्य गृहमहोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली. कंपनीच्या संचालिका पूनम गोखले व वित्तीय सल्लागार अतुल गलांडे या वेळी उपस्थित होते. या गृहमहोत्सवाचे हे सलग सातवे वर्ष आहे.

या विषयी माहिती देताना विशाल गोखले म्हणाले, ‘नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ नवे गृहप्रकल्प सादर करणे व पूर्ण झालेल्या नऊ गृहप्रकल्पांचे हस्तांतरण करणे ही गोखले कन्स्ट्रक्शन्सची परंपरा आम्ही याही वर्षी कायम राखत आहोत, याचा आम्हाला विशेष आनंद आहे.’

‘यंदा आयडियल कॉलनी, मयूर कॉलनी, रामबाग कॉलनी, कर्वेनगर, डहाणूकर कॉलनी, मुकुंद नगर, सहकार नगर, सुभाष नगर आणि औंध अशा शहरातील नऊ मध्यवर्ती ठिकाणी साकारत असलेल्या आमच्या विविध गृहप्रकल्पांमधून ग्राहकांना आपल्या स्वप्नातील घर निवडता येणार आहे. विशेष म्हणजे नवरात्रीच्या काळात सदनिका नोंदवल्यास नऊ हजार ९९९ प्रती चौरस फूट इतक्या विशेष सवलतीच्या दराचा लाभ ग्राहकांना घेता येईल. या गृहप्रकल्पांमध्ये दोन बीएचकेपासून ४.५ बीएचके पर्यंतच्या सदनिका उपलब्ध असून, त्यांची किंमत रुपये एक कोटी २५ लाखांपासून पुढे असेल. महोत्सवातील सर्व गृहप्रकल्प हे रेरा नोंदणीकृत आहेत,’ असेही गोखले यांनी सांगितले.

‘सिंहगड पायथ्याशी असलेल्या डोणजे गावात पूर्णत्वास आलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या ‘मिस्ट’ या गृहप्रकल्पात अत्यंत वाजवी किंमतीत ‘रेडी पझेशन’ सदनिका खरेदी करणे शक्य होणार आहे. ग्राहकास प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध सवलतींचा अंतर्भाव करणे शक्य असल्यास एक बीएचके सदनिका सुमारे १५.५० लाख रुपयांपर्यंत, तर दोन बीएचके सदनिका २४.५० लाख रुपयांत खरेदी करता येईल,’ असेही गोखले यांनी नमूद केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZRTCE
Similar Posts
गोखले कन्स्ट्रक्शन्सतर्फे यंदाही नवरात्रात घरखरेदीची सुवर्णसंधी पुणे : दर्जेदार निवासी गृहप्रकल्पांची निर्मिती व जुन्या निवासी इमारतींचा पुनर्विकास करण्याच्या क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या ‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’तर्फे या वर्षीही नवरात्राच्या पावन पर्वात घरखरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. गोखले कन्स्ट्रक्शन्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी ही माहिती दिली
माझं घर ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत, लहानपणापासून आजतागायत त्यांचं ज्या-ज्या ठिकाणी वास्तव्य झालं, त्या घरांबद्दल...
नवरात्रीनिमित्त सामूहिक पठणाने महालक्ष्मीचा जागर पुणे : शालेय विद्यार्थी, शिक्षक, राजकीय नेते, अभिनेते, अभिनेत्री आणि गायकांनी मिळून सामूहिक अथर्वशीर्ष आणि पाच वेळा श्रीसूक्ताची आवर्तने करून महालक्ष्मीचा जागर केला. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिरातर्फे सामूहिक पठण आयोजित केले होते. गणेश कला क्रीडामंच येथे हा कार्यक्रम झाला. शंखनाद,
पत्रकारांसाठी ‘म्हाडा’तर्फे घरकुल योजना पुणे : ‘पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच सकारात्मक असून, ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पत्रकारांचा घराचा प्रश्नही महत्त्वाचा असून, ‘म्हाडा’च्या विशेष योजनेच्या माध्यमातून पुण्यातील पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language